छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब चा मुलगा अकबर
अकबर हा औरंगजेब चा आणि त्याची बेगम दिलरस बानु चा मुलगा होता. सत्तेच्या मोहातून औरंगजेबाने आपल्या वडिलांचा म्हणजेच शहाजहान याचा आणि सख्या भावांचा जीव घेतला होता. औरंगजेब हे क्रूरकृत्य आपल्याबरोबर पण करू शकतो असे अकबराला वाटू लागले. त्याच वेळी राजपुतांनी औरंगजेब विरुद्ध बंद केला होता. हे राजपूत अकबर ला आपल्यात सहभागी करून घेण्यात यशस्वी झाले होते. राजपुतांच्या मदतीने अकबर आपल्या जन्मदात्या वर चाल करून गेला. परंतु औरंगजेबाच्या कट कारस्थानांमुळे त्याची हि चाल यशस्वी झाली नाही. त्यानंतर अकबर हा स्वतःच्या बापा विरुद्ध बंड करून दिल्ली सोडून निघून गेला.
संपुर्ण हिंदुस्थानात आलमगीर औरंगजेब याच्या बरोबर टक्कर घेऊ शकेल असा एकच सिंहाचा छावा होता. तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. हे अकबराला माहित होते. या मुळेच अकबर शंभूराजांच्या भेटीसाठी महाराष्ट्रात आला होता आणि संभाजी महाराजांच्या भेटीसाठी अतुर होता. अकबरा बरोबर दुर्गादास राठोड हा रजपूत अकबर बरोबर आला होता.
भेटीचे बरेच खलिते पाठवल्या नंतर छत्रपती शंभूराजांनी अकबराची भेट घेतली. अकबराने आपला मनसुबा महाराजांकडे व्यक्त केला. अकबर ला पुन्हा एकदा दिल्लीवर चालून जायचे होते आणि अकबर ची इच्छा होती कि संभाजी महाराजांनी आपले सैन्य आणि पैसा या गोष्टी साठी द्यावा. छत्रपती या गोष्टी साठी तयार झालेही असते परंतु याच वेळीस छत्रपती संभाजी ५ वेग वेगळ्या शत्रूंबरोबर झुंजत होते. त्यामुळे त्यांनी अकबराला थोडे महिने थांबण्याचा सल्ला दिला. त्या प्रमाणे अकबर महाराष्ट्रात थांबलाहि.
परंतु नंतर शंभूराजांच्या मदतीने तो पर्शिया ला निघून गेला.
Kitee Ale Ani Kitee Geale Pan Vahag Te Vahagcha Rahile.
Phakt ani Phakt amhi shambhu rajyanchech bhakt…