दख्खन स्वारी – दक्षिण प्रांतातील चिक्कदेव राजावरील आक्रमण
दक्षिणेतील सरदार औरंगजेब ला सामील होवू नये यासाठी संभाजी राजांनी मैसूर च्या चिक्कदेव राजाशी मैत्रीचा प्रयत्न केला होता.
पण त्या गर्विष्ट चिक्कदेव ने मराठ्यांच्या ३ पराक्रमी सरदारांची कत्तल करून त्यांची मुंडकी श्रीरंगपट्टणम च्या वेशीवर टांगली होती.
औरंगजेबाचे स्वराज्यावरील आलेले संकट सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडे काही काळ सोपवून छत्रपती संभाजी महाराज दक्षिणेकडे निघाले.
संभाजी राजांनी त्रिचनापल्लीच्या पाषाणकोट ला वेढा घातला. फार मोठा रणसंग्राम झाला. मराठ्यांनी किल्ल्यावर अग्नी बाणांचा वर्षाव सुद्धा केला.
अखेरीस किल्ला जिंकला. त्यानंतर मात्र मैसूरकर चिक्कदेवाचे धाबे दणाणले आणि तो तह करण्यासाठी तयार झाला.
Ilikeit