संभाजी महाराज यांचा इंग्रजासोबत करार
तारीख: २६ एप्रिल १६८४
स्थळ: बीरवाडी चा किल्ला
तहातील मुद्दा: मराठ्यांच्या अधीपत्या खाली असलेल्या जिंजी आणि मद्रास या प्रदेशात वखार बांधण्याची परवानगी.
करार / तहातील प्रमुख अटी:
१) वखारीची उंची, लांबी आणि रुंदी हि नियोजित प्रमाणानुसारच असावी
२) गुलाम खरेदी आणि विक्री यावर बंदी.
३) बालकामगार बंदी.
४) आयात व निर्यात यावर जकात.
५) धर्मांतर बंदी.
शंभुराजे इंग्रजांबरोबर करार करण्यासाठी बीरवाडीच्या किल्ल्यात दाखल झाले. छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या नाकाबंदी चा परिणाम म्हणजे इंग्रज तहा साठी आणि करारासाठी अतिशय उत्सुक होते.
परंतु या तहाच्या नावाखाली इंग्रजांना त्यांचे बरेचसे छुपे मनसुबे साध्य करायचे होते. व्यापाराच्या नावाखाली राजकारणात शिरकाव करू पाहणाऱ्या धुर्त इंग्रजांना वेळीच रोखणे आवश्यक होते हे शंभूराजांनी ओळखले होते.
याचा परिमाण म्हणजे संभाजी राजांनी करार केला परंतु त्या तहात बऱ्याचश्या अटी घालून इंग्रजांच्या मुसक्या आवळल्या होत्या. वाखारीच्या परवाण्या खाली भुईकोट किल्ला उभारण्याचा इंग्रजांचा बेत शंभूराजांनी हाणून पाडला.