संभाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची आषाढी वारी
महाराणी येसूबाई यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले होते, “श्री शाहु महाराज”. या समयी देहू वरून खुद्द “महादेव महाराज” त्यांना आशिर्वाद देण्यासाठी आले होते. महादेव महाराज म्हणजे संतश्रेष्ठ जगदगुरु श्री तुकाराम महाराज यांचे सुपुत्र.
महादेव महाराजांच्या भेटी मागचे अजून एक कारण होते, ते म्हणजे; देहु ते पंढरपुर अशी संत तुकाराम महाराज यांची पालखी सुरु करावी असे महादेव महाराजांना मनापासून वाटत होते. परंतु जागोजागी असलेले औरंगजेबाचे मुघल सैन्य या महान कार्यासाठी अडथळा ठरू पाहत होते.
छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समोर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपली व्यथा पण सांगितली. शंभू राजांनी तात्काळ या आषाढी वारी ला आपली संमती दर्शवली. स्वराज्याचे मावळे या पालखीस संरक्षण देतील अशी हमी देखील दिली. इतकेच नव्हे तर पंढरपूर वारी च्या या पालखीस आर्थिक मदत देखील देऊ केली. संभाजी महाराजांनी तात्काळ याचा आदेश जागोजागी आपल्या सरदार आणि मावळ्यांना पाठवला. या मुळे वारकरी आणि धारकरी यांचे नाते अधिकच घट्ट झाले.
शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. याचीच पुनरावृत्ती म्हणजे संभाजी महाराज आणि महादेव महाराज यांचेही जिव्हाळ्याचे संबंध होते, आणि या प्रसंगा नंतर जणू काही ते अजूनच दृढ झाले.
Chhatrapati sambhaji maharaj ko jai!!!!
The great Chhtrapati Sambhaji maharaj ki jai !!!