कट-कारस्थान करणाऱ्या मंत्रांना शिक्षा
औरंगजेबाचा मुलगा अकबर स्वतःच्या बापाविरुद्ध बंड करून महाराष्ट्रात आला होता. संपूर्ण हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर घेऊ शकेल असा सिंहाचा छावा एकच होता तो म्हणजे संभाजी महाराज. त्यामुळेच अकबर शंभुराजांकडे मदतीच्या अपेक्षेने आला होता.
जे अकबराला कळाले ते मात्र रायगडावरच्या खुद्द संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळा तल्या मंत्र्यांना कळाले नाही. उलट हे मंत्री महाराजांच्या जीवावर उठले होते. संभाजी महाराजांवर पन्हाळा गडावर विषप्रयोग झाला होता. शंभूराजांच्या रायगडावरील मंत्र्यांचा यात सहभाग होता. पण सुदैवाने शंभूराजे यातून वाचले.
त्यांनतर तर मंत्र्यांनी कहरच केला. शंभूराजे रायगडावर नाहीत आणि औरंगजेबाचा मुलगा अकबर महाराष्ट्रात आला आहे ही संधी साधुन रायगडावरच्या काही मंत्र्यांनी संभाजी महाराजांनी ठार करण्याचा बेत आखला.
त्यांनी तसे पत्र अकबराला पाठवले होते. या पत्रात त्यांनी शंभूराजे यांचा बदनामी पर उल्लेख करून खोट्या गोष्टी लिहिल्या. संभाजी राजांना जीवे मारण्याची विनंती केली. वेळ पडल्यास स्वराज्यातील काही भाग यासाठी अकबराला देऊ असे या पत्रात कबुल केले.
अकबराला हे पत्र मिळाले परंतु अकबर याकरिता तयार झाला नाही. याची 2 कारणे, पहिले कारण म्हणजे संभाजी महाराज हा सिंहाचा छावा आहे आणि त्याच्या विरुद्ध काही कट कारस्थान करणे हे अशक्यप्राय होते हे अकबर जाणून होता. आणि दुसरे कारण म्हणजे शंभूराजे आपल्या इमानदारीची परीक्षा घेत आहेत की काय असा संशय अकबराला आला. याचा परिणाम असा झाला की अकबराने आपली 2 माणसे कट कारस्थानाची पत्रे घेऊन पन्हाळ गडावर पाठवली. ती माणसे म्हणजे सरदार मिर्झा यहुद्दीन शुजाई आणि वकील अब्दुल हमीद.
संभाजी महाराजांनी ते पत्र बघताच ओळखले. पत्रावरील मंत्र्यांची मोहोर आणि मंत्र्यांचे हस्ताक्षर यावरून हि ओळख पटली. आणि ते पाहताक्षणी छत्रपती संभाजी महाराज यांची तळपायाची आग मस्तकात गेली. लागलीच त्यांनी मंत्र्यांना पकडण्याचे फर्मान सोडले आणि स्वतः रायगडाच्या दिशेने कूच केली.
जिवाजी हरी यांनी संभाजी महाराज यांच्या आदेशानुसार मुजुमदार अण्णाजी दत्तो, चिटणीस बाळाजी, आवजी, सोमाजी दत्तो, हिरोजी यांना पालीजवळ सुधागड ला जेरबंद केले होते.
मंत्र्यांच्या गिरफ्तारिचा संदेश मिळताच शंभूराजे पालीला सुधागड ला पोहोचले. त्यांनी सर्व दोषी मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली देवुन देहांताची शिक्षा दिली.
nice artical
Jay Shivaji
Jay Sambhaji